उस्मानाबाद : ‘‘हवामानाचा लहरीपणा पाहता शेतकऱ्यांनी हवामान साक्षर होण्यासाठी डिजिटल माध्यमांशी जवळीक साधून हवामान आधारित शेतीचा अवलंब करावा’’, असा सल्ला तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. नकुल हरवाडीकर यांनी दिला.
परांडा तालुक्यातील आसू, कंडारी व भूम तालुक्यातील पखरुड येथे हवामान आधारित शेती संदर्भात मेघदूत व दामिनी ॲप जनजागृती अभियान व शेतकरी जागृकता कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
डॉ. हरवाडीकर म्हणाले, ‘‘खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला आहे. यामुळे रब्बी पिकांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी रब्बी पिकांची पेरणी करताना जैविक किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे पिकांमध्ये वाढीच्या अवस्थेत बुरशीजन्य रोगाची लागण होणार नाही.’’