सोलापूर : जिल्ह्यातील सर्व गावातील खरीप पिकांचा सुधारित गोषवारा जाहीर झाला. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या शून्य आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी येत्या १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
पाऊस कमी झाल्यास ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या वाढली असती, परंतु, यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे ५० पैशांपेक्षाही कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या शून्य राहिली आहे. दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाची पैसेवारी काढली जाते.
प्रतिवर्षी त्या-त्या हंगामात तीन टप्प्यात ही पैसेवारी काढली जाते. सुरवातीच्या टप्प्यात हंगामी पैसेवारी मोजली जाते. त्यानंतर सुधारित पैसेवारी आणि नंतर अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यात ही पैसेवारी काढली जाते. त्यानुसारच हंगामाचं भवितव्य ठरलं जातं. चांगल्या पावसामुळे सुधारित पैसेवारीप्रमाणेच अंतिम पैसेवारीतील गावेही याच पद्धतीने शून्यावर येतील, असे सांगण्यात आले.