नवी दिल्ली ः उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना आणि पंजाबसह अन्य राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील सिकरमध्ये ४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, जम्मू- काश्मीरच्या काही भागांतील तापमान हे शून्याच्याही खाली गेले आहे. काश्मीर खोऱ्यातील ही स्थिती ख्रिसमसपर्यंत कायम राहू शकते असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
नंदनवनाची राजधानी असलेल्या श्रीनगरचा पारा उणे पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्येही तो उणे ५.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. गुलमर्गमध्ये उणे सहा अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. हरियाना आणि पंजाबमधील हिसार, आदमपूर आणि लुधियाना या भागांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हरियानाच्या हिसारचा पारा २.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. आदमपूर आणि लुधियानामध्येही तीव्र थंडी होती.
दृश्यमानता खालावली
पंजाबमधील अमृतसर, पतियाळा, फरीदकोट, हलवाडा, भटिंडा या ठिकाणांवर तीव्र थंडी असून, सरासरी दृश्यमानता देखील खालावली आहे. हरियानातील अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी आणि सिरसा शहरांमधील तापमान आणखीन खालावले आहे. चंडीगडचा पारा ५.७ (अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे.