• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, April 19, 2021
आम्ही कास्तकार Logo
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
  • मुख्यपृष्ठ
  • कृषी सल्ला
  • हवामान अंदाज
  • पीक व्यवस्थापन
  • शेतीविषयक योजना
    • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
    • महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना
    • पंतप्रधान पीक विमा योजना
    • किसान क्रेडिट कार्ड
    • सौर कृषी पंप योजना
    • इतर योजना
  • कृषिपूरक
    • कुक्कुट पालन
    • मत्स्य व्यवसाय
    • शेळी पालन
    • इतर कृषिपूरक
    • कृषी प्रक्रिया
    • तंत्रज्ञान
  • शेती पिके
    • धान्य
    • भाजीपाला
    • नगदी पिके
    • फळे
    • फुले
  • इतर माहिती
    • बाजारभाव
    • यशोगाथा
    • शासन निर्णय
    • व्हिडिओ
    • संधी
    • Telegram Group
    • आमचे इतर प्रकल्प
      • हवामान अंदाज आणि बातम्या
      • हवामान अंदाज.इन
      • आम्ही कास्तकार.कॉम
No Result
View All Result
आम्ही कास्तकार logo
No Result
View All Result

उपयुक्त जिवाणू वाढवितात जमिनीची सुपीकता

Team आम्ही कास्तकार by Team आम्ही कास्तकार
16 March 2021
in कृषी सल्ला, बातम्या
3 min read
0

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो.

जमिनीची सुपीकता केवळ त्यात असलेली अन्नद्रव्ये आणि रासायनिक घटकांवरच अवलंबून नसून त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे आणि किती सूक्ष्म जिवाणू आहेत यावर अवलंबून आहे. पिकांच्या मुळाभोवती सूक्ष्म जिवाणू मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. कारण पिकांची मुळे सेंद्रिय आम्ल, साखर, जीवनसत्त्वे आणि वाढवर्धक पदार्थ जमिनीत सोडतात, या पदार्थावर हे जिवाणू वाढतात. 

सूक्ष्म जिवाणूंचे फायदे

  • सूक्ष्म जिवाणूंमुळे सेंद्रिय घटकातील सेंद्रिय नत्राचे (प्रथिने) रूपांतर नायट्रोसोमोनस जिवाणूकडून अमोनियममध्ये होते. त्यानंतर अमोनिअमचे रूपांतर नायट्रोबॅक्‍टर जिवाणूकडून नायट्रेट नत्रामध्ये होऊन उपलब्ध नत्राचा पुरवठा पिकास होण्यास मदत होते. 
  • सेंद्रिय घटकात स्फुरद हा फायटिन, न्यूक्लिक ॲसिड आणि फॉस्पोलिपिड या स्वरूपात असतो. या घटकाचे जिवाणूकडून विघटन होऊन ऑर्थोफास्फेट या स्वरूपात स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. 
  • गंधक हे अन्नद्रव्य सेंद्रिय पदार्थात मिथीओनिन, सिस्टीन व सिस्टाइन या अमिनो आम्ल स्वरूपात असते. या अमिनो आम्लाचे जिवाणूकडून विघटन होऊन त्याचे रूपांतर सल्फेटच्या स्वरूपात होऊन पिकास उपलब्ध होते. 
  • पिकास लागणारी इतर अन्नद्रव्य जसे पालाश, कॅल्शिअम, मँगेनीज, लोह, जस्त इत्यादी सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाने पिकास उपलब्ध होतात. 
  • नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर करता येतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. तसेच शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात. 

नत्र स्थिर करणारे जिवाणू 

  • पृथ्वीच्या वातावरणात नत्रवायू ७८ टक्क्यांपर्यंत असतो. परंतु या नत्रवायूचा उपयोग वनस्पती करू शकत नाहीत. ॲझेटोबॅक्‍टर, रायझेबियम जिवाणू खतातील उपयुक्त सूक्ष्म जिवाणू वातावरणातील वायुरूपात असलेला नत्र शोषण करून झाडांना उपलब्ध करून देतात. नत्राची इतर संयुगे तयार करतात आणि ती झाडांना उपलब्ध होतात. या प्रक्रियेस जैविक नत्र स्थिरीकरण असे म्हणतात.
  • ॲझोटोबॅक्‍टर जमिनीत मुक्तपणे राहून नत्र वायूचे जमिनीत स्थिरीकरण करतात. 
  • रायझोबियम कडधान्य पिकाशी सहजीवी नाते प्रस्थापित करून नत्राचे स्थिरीकरण करतात, हे जिवाणू नत्रवायूचे रूपांतर अमोनियात करतात.

  स्फुरद विरघळविणारे जिवाणू

  • जमिनीत स्फुरदयुक्त खते दिली असता त्याचे रूपांतर अविद्राव्य फॉस्फेटमध्ये होते. त्यामुळे पिकास स्फुरद मिळत नाही. हाडाचे खत, रॉक फॉस्फेट, बेसिक स्लॅग आणि रासायनिक खतांद्वारे पुरवलेला स्फुरद सर्वच्या सर्व पिकास उपलब्ध होत नाही. यापैकी २० ते २५ टक्के स्फुरद पिकांना वापरात येऊ शकतो. बाकीचा ७५ ते ८० टक्के स्फुरद मातीच्या कणावर स्थिर होतो. तो पिकाला उपलब्ध होत नाही.
  • उपलब्ध स्फुरदाचा पिके पूर्णत: वापर करू शकत नाहीत. त्यासाठी स्फुरद विरघळविण्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे जिवाणू करत असतात. त्यामुळे तो पिकांना उपलब्ध होतो. 
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू सायट्रिक, लॅक्‍टिक, सक्‍सिनिक, मॅलिक यांसारखी अनेक सेंद्रिय आम्ले स्रवतात. ही आम्ले अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेल्या स्फुरदाचे पिकाला उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. 
  • स्फुरदयुक्त खताबरोबर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूचा वापर केल्यास वाया जाणारे खत उपयोगी पडते. स्फुरदाची मात्रा कमी करणे शक्‍य होते. 
  • स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूची वाढ व कार्यक्षमता मुळाभोवती जास्त असते. 

सेंद्रिय घटक कुजविणारे जिवाणू 

  • कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी त्यावर सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची क्रिया व्हावी लागते. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा सहभाग जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • जमिनीत मिसळलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीतील वेगवेगळ्या सूक्ष्म जिवाणूंच्या माध्यमातून शेवटी त्याचे ह्यूमसमध्ये रूपांतर होते. या कुजविण्याच्या आणि ह्यूमिक पदार्थ तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये मूळ सेंद्रिय पदार्थांमध्ये बंदिस्त असलेली वनस्पतीची पोषक द्रव्ये ही जमिनीमध्ये सोडली जातात. ती पिकांना सहज उपलब्ध होतात. अशा प्रकारे वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचा चक्रीयरीत्या पुनर्वापर होतो. 

द्रवरूप जिवाणू खते 
उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक द्रवरूप वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. या द्रवरूप वाहकामध्ये उपयुक्त असे उच्च प्रतीचे जास्त संख्येने जिवाणू आणि त्यांना लागणारी अन्नद्रव्ये असतात. 

वैशिष्ट्ये 

  • उपयुक्त जिवाणूंचा जीवित राहण्याचा कालावधी १२ ते १४ महिन्यांपर्यंत असतो. 
  • द्रवरूप जिवाणू खताची कार्यक्षमता प्रतिकूल वातावरणातसुद्धा सारखी राहते. जास्त तापमानाचा (४० ते ४५ अंश सेल्सिअस) आणि अतिनील किरणांचा जिवाणूवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचे गुणधर्म बदलत नसून कायम राहतात. 
  • जिवाणूंची संख्या (१०८  ते १०९ प्रति मिलि) सतत स्थिर राखली जाते. 
  • विकरांची क्रिया खूपच जास्त असल्यामुळे शुद्धता राखली जाते. त्यामुळे दूषित होण्याचे प्रमाण खूप कमी असते.
  • द्रवरूप असल्यामुळे वापरण्यास व हाताळण्यास सोपी असतात. 
  • व्हेंच्युरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून अगदी सहजरीत्या पिकास देता येतात. 
  • बिया आणि जमिनीमध्ये जगण्याची क्षमता जास्त. 

संपर्क ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (सहायक प्राध्यापक, मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

News Item ID: 
820-news_story-1607084874-awsecm-901
Mobile Device Headline: 
उपयुक्त जिवाणू वाढवितात जमिनीची सुपीकता
Appearance Status Tags: 
Tajya News
Site Section Tags: 
कृषी सल्ला
The use of fertile soil and biofertilizers for strengthening the growth of the crop.The use of fertile soil and biofertilizers for strengthening the growth of the crop.
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi article regarding world soil day
Author Type: 
External Author
डॉ. पपिता गौरखेडे
खत fertiliser जैविक खते biofertiliser साखर incidents कडधान्य रॉ रासायनिक खत chemical fertiliser ठिबक सिंचन सिंचन कृषी विद्यापीठ agriculture university
Search Functional Tags: 
खत, Fertiliser, जैविक खते, Biofertiliser, साखर, Incidents, कडधान्य, रॉ, रासायनिक खत, Chemical Fertiliser, ठिबक सिंचन, सिंचन, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 
Meta Keyword: 
article, world soil day, fertility
Meta Description: 
article regarding world soil day
नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो.

Source link

READ ALSO

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

Tags: Agriculture Marathi NewsAgriculture NewsAgriculture News MarathiFarming News MarathiFarming News Update MarathiMarathi Agri NewsMarathi Agri News Update

Related Posts

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या
बातम्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले
बातम्या

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती
बातम्या

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती चे मंडी रेट 18 April 2021
बाजारभाव

तूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021

18 April 2021
Next Post

कृषी सल्ला (राहुरी विभाग)

नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर आत्मक्लेष जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
Currently Playing

LATEST NEWS UPDATES

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा?  तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा? तज्ञांचे मत जाणून घ्या

19 April 2021
केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

केजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले

19 April 2021
(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021

19 April 2021
कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

कृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती

19 April 2021
नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

नोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती

19 April 2021
राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

राम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा

19 April 2021
ऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)

ऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)

19 April 2021
हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

हवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता!

19 April 2021
राज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी

पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा

Amhi Kastkar – आम्ही कास्तकार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

© 2020 आम्ही कास्तकार - Managed by Pritam Sonone.