औरंगाबाद : जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी ११ केंद्र सुरू करण्यात आली. या केंद्रावरून २१ हजार ९४३ क्विंटल मकाची १८५० रुपये प्रतिक्विंटल या किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आली. १६ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजेपासून मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदीचे पोर्टल बंद पडले आहे. शासनाचा बाजारातील हस्तक्षेप थांबल्याने मकाला किमान आधारभूत किमत मिळत नसल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, पिशोर, फुलंब्री, करमाड, सिल्लोड, सोयगाव, लासूर, तुर्काबाद आदी ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. या खरेदी केंद्रावरून ऑनलाइन नोंदणीला जवळपास ९ केंद्रावरून प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये ४५५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये गंगापूरच्या केंद्रावरून १००३, खुलताबाद ९८९, वैजापूर ९५७, कन्नड ८२२, फुलंब्री १२२, करमाड १४२, सिल्लोड १, सोयगाव ६३ तर लासूरच्या केंद्रावरून ४५८ शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीने मका खरेदी व्हावी म्हणून ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी १८२० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यामध्ये गंगापूर केंद्रावरील २२०, खुलताबाद ५५५, वैजापूर ५१५, कन्नड २९०, करमाड १००, सोयगाव १५ तर लासूर स्टेशन केंद्रावरून प्रत्यक्ष खरेदीसाठी येण्याचा एसएमएस पाठविलेल्या १२५ शेतकऱ्यांचा समावेश होता.
खरेदीसाठी एसएमएस पाठविलेल्या ५४८ शेतकऱ्यांकडील २१९४३ क्विंटल ५० किलो मक्याची खरेदी करण्यात आली. खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ऑनलाइन मका खरेदीचे पोर्टल १६ डिसेंबर २०२० ला दुपारी ३.३० पासून बंद झाले. शासनाची खरेदी बंद झाल्यामुळे पर्याय नसल्याने बाजारात आपली मका मिळेल त्या दराने विकावी लागत आहे.
बाजारात मक्याला ११८० ते १२५५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० रुपयांचा तोटा मका उत्पादकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात आलेल्या मका पैकी २१३३२ क्विंटल मक्याच्या हुंड्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.