बुलडाणा ः कांदा बीजोत्पादनात विदर्भात अग्रेसर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीपासून अडचणी उभ्या राहू लागल्या आहेत. लागवड होऊन एक महिन्यापेक्षा अधिक दिवस लोटले आहेत. परंतु कांदा बीजोत्पादक पात वाळणे, कांदा सड या बाबींमुळे यंदा धास्तावले.
कांदा दरवाढीमुळे बीजोत्पादनाच्या क्षेत्रात यंदा वाढ झाली आहे. जिल्हाभर प्रत्येक तालुक्यात शेतकरी कांदा लागवडीसाठी पुढे आले. बेण्याला एकाचवेळी मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी, कंपन्यांनी नवीन कांदा पुरविला. यात काही कांदा टोळीचा दर्जा चांगला नव्हता. त्याचा फटका शेतकऱ्यांना आधीच सहन करावा लागला. लागवडीनंतर पुन्हा कांदा सड प्रत्येक प्लॉटमध्ये आढळली. उगवण झालेल्या कांद्याची पात वाळणे, कांदा उपटून बघितल्यानंतर काही ठिकाणी कुजलेला, अळी आढळून येणे, असे प्रकार झालेले आहेत. हुमणी अळीनेही या पिकात आपला उपद्रव दाखविल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कांदा पिकावर अशा प्रकारची कीड काही शेतकरी पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगत आहेत. ही कीड आतील बाजूने असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकरी तज्ज्ञांशी बोलून किडनाशकांची माहिती घेत उपाययोजना करीत आहेत.
प्रतिक्रिया
दोन एकरात लागवड केली असून त्यात १० टक्क्यांपर्यंत सड दिसून आली आहे. पात वाळून जात आहे. कांदा उपटून बघितला असला आत कुजलेला दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ड्रिनिंग व इतर उपाययोजना करीत आहे.
– नारायण राजपूत, कांदा बीजोत्पादक, बुलडाणा
आम्ही तिघा भावांमिळून १० एकरात लागवड केली आहे. त्यात सुरुवातीला लागवडीच्यावेळेसच १० टक्के सड दिसून आली होती. उपाययोजना केल्यानंतर आता पीक सुधारले आहे. सध्या स्थिती चांगली दिसून येत आहे.
– दत्ता राऊत, कांदा बीजोत्पादक, साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा.