पुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. ३) रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण, भजन, कीर्तन आणि पिठलं भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले.
कृषी आणि पणन कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या चार, पाच दिवसांपासून पंजाब आणि हरियाना राज्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी रात्री आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल हिपरगी, बापू कारंडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.