जळगाव ः खानदेशात कृषी पणन सुधारणा कायदे रद्द करण्याच्या मागणीसंबंधी मंगळवारी (ता. ८) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या ‘बंद’मध्ये शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना सहभागी झाली नाही. काँग्रेसने बंदमध्ये सहभाग घेतला. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने बंदला पाठिंबा दिला. जळगाव शहरात लोकसंघर्ष मोर्चातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी वल्लभदास वालजी (गोलाणी) व्यापारी संकुल सुरू झाले. परंतु ते बंदमध्ये सहभागी संघटनांनी बंद केले.
जळगाव बाजार समितीत सकाळी भाजीपाल्याचे लिलाव झाले. नंतर धान्य मार्केट यार्ड बंद करण्यात आले. महात्मा फुले मार्केटही बंद करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सुरेंद्र पाटील, करीम सालार आदींनी बंदसंबंधी कार्यवाही केली. जळगावात डिस्ट्रिक्ट फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनने बंदमध्ये सहभाग घेतला व खते, कीडनाशक विक्रीची दुकाने बंद केली. संघटनेचे विनोद तराळ यांनी यासंबंधी कार्यवाही केली.
जळगावात काही दुकानदारांना बंदची सक्ती केल्याने बंदमधील कार्यकर्ते व दुकानदार, संचालकांमध्ये वादही झाले. चोपडा (जि. जळगाव) येथे शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वात गलंगी (ता. चोपडा) येथे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धुळे येथे बाजार समिती, देवपूर रोड भागातील वाणिज्य आस्थापने बंद करण्यात आली. रिक्षाचालक संघटनादेखील धुळ्यात बंदमध्ये सहभागी झाल्या.