जळगाव ः जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. यामुळे क्षेत्र तब्बल दुप्पट वाढले आहे.
कांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले आहेत. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. करार करून घेतले आहेत. त्यात २० रुपये प्रतिकिलो दरात कांद्याचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला. तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा लागवड सुमारे १५०० हेक्टरने वाढली आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कांदा बीजोत्पादनासंबंधी प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली आहे. तसेच खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे कांदा बीजोत्पादनाला शेतकऱ्यांनी यंदा जिल्ह्यात पसंती दिली आहे. तसेच काही खरेदीदारांनी खते, फवारणीसाठीची कीडनाशकेदेखील पुरविण्याची तयारी दाखविली. हा खर्च सुरुवातीला कंपन्या करतील. नंतर हा खर्च कपात केला जाईल.
सद्यःस्थितीत कांदा बिजोत्पादनासंबंधीची लागवड आटोपली आहे. गेल्या आठवड्यातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग झाला आहे.