पुणे ः जम्मू काश्मीर व परिसर आणि पाकिस्तानच्या दक्षिण भागात हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतातील जवळपास सर्वच राज्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे थंडीच्या कडाक्याने वर्षाचा निरोप घ्यावा लागणार आहे. राज्यातही थंडी वाढणार आहे. मंगळवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील काही भागात हिमवृष्टी कमी अधिक होत आहे. मागील दोन ते तीन दिवस या भागात हिमवृष्टी कमी झाल्याने थंडी कमी झाली होती. मात्र, पुन्हा या भागात हिमवृष्टी होत असल्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. तसेच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा या भागातही थंडीची लाट आली आहे.
आज (बुधवार) आणि उद्या (गुरूवारी) या भागांतील किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होईल. यामुळे राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे ०.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले.
थंडीची लाट आणि उत्तरेकडून थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढणार आहे. सध्या विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. कोकणातही थंडीने जम बसविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मध्य महाराष्ट्रातही चांगलीच थंडी आहे.
मराठवाड्यात थंडीत चढउतार असून किमान तापमान ११ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भात काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले.
मंगळवारी (ता.२९) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रुझ) १५.० (-२), ठाणे १७.०, अलिबाग १५.८ (-२), रत्नागिरी १८.२ (-१), डहाणू १३.२(-४), पुणे १३.१ (३), नगर १३.५ (३), जळगाव १०.६ (-१), कोल्हापूर १८.० (३), महाबळेश्वर १४.९ (२), मालेगाव १२.४ (-२), नाशिक ११.८(२), निफाड ८.५, सांगली १६.८ (२), सातारा १५.० (२), सोलापूर १६.६ (३), औरंगाबाद १२.४ (१), बीड १६.० (३), परभणी १३.८ (१), परभणी कृषी विद्यापीठ ११.५, नांदेड १२.५, उस्मानाबाद १४.३(१), अकोला १२.६ (-१), अमरावती १४.८ (१), बुलडाणा १२.४ (-२), चंद्रपूर १४.६ (१), गोंदिया १२.८ (१), नागपूर १४.२ (२), वर्धा १४.५ (२), यवतमाळ १३.५ (-१).