नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील ८८ हजार ७९१ शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी पीकविमा भरला आहे. यात शेतकऱ्यांनी तीन कोटी १७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी ज्वारीसाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले होते.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. सन २०२०-२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीत शेतकऱ्यांनी ऑनलाइन विमा हप्ता भरला. यात रब्बी ज्वारीसाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत होती.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले होते. यात बागायती गव्हासाठी ३५ हजार जोखीम रक्कम तर हेक्टरी ५७० रुपये विमा हप्ता होता. रब्बी ज्वारीसाठी २८ हजार जोखीम रक्कम होती तर ४२० रुपये विमा हप्ता होता. हरभऱ्यासह हेक्टरी ३५ हजार रुपये विमा जोखीम रक्कम होती तर ५२५ रुपये विमा हप्ता होता.
विमा हप्ता भरण्याच्या मुदतीत जिल्ह्यातील ८८ हजार ७९१ अर्जदार शेतकऱ्यांनी तीन कोटी १७ लाख पाच हजार २८७ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. विमा हप्त्यात राज्य सरकारचा हिस्सा २८ कोटी ८९ लाख व केंद्राचा हिस्सा २८ कोटी ७९ लाखांचा राहणार आहे.
विमा कंपनीला एकूण ६० कोटी ७५ लाखांचा विमा हप्ता मिळणार आहे. यातून विम्यापोटी एकूण २११ कोटी ३६ लाख ८५ हजार ९४३ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. जिल्ह्यात सर्वाधीक ६५ हजार ५२१ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी विमा भरला आहे.