नागपूर : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात पावसाने सरासरी ओलांडली. त्याचा फटका खरीप पिकांना बसला. मात्र संततधार पावसामुळे जमिनीत ओल कायम असल्याने ती रब्बीला पोषक ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात नैसर्गिक संकटांची मालिकाच होती. सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यातच सुरुवातीला पावसाने खंड दिला. परिणामी उत्पादकता प्रभावित झाली. पुढे मात्र संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगाम हातचा गमावण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांची सारी भिस्त रब्बी हंगामावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला पिके घेतली जातात.
जिल्ह्याचे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ७३ हजार ५७७ आहे. गेल्यावर्षी रब्बीमध्ये कृषी विभागाचे १ लाख ५५ हजार इतके नियोजित क्षेत्र होते. गेल्या वर्षी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ५८ हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३६५३ हेक्टर अधिकचे म्हणजे एक लाख ७७ हजार २०० हेक्टरचे नियोजन केले आहे. यंदा रब्बी हंगामात ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू, ८६ हजार हेक्टरवर हरभरा लागवड राहील. या दोन मुख्य पीकांसासोबतच ज्वारी, मका याची लागवड होणार आहे. हरभऱ्याच्या नियोजित क्षेत्राच्या ९० टक्के तर गव्हाची २७ टक्के व ज्वारीची १५ टक्के पेरणी झाली आहे.
अशी झाली पेरणी
- गहू २६१४३
- हरभरा ६३९९०
- ज्वारी १८५
- मका १४५
- जवस २७
- सूर्यफूल १०००
- मोहरी ३००