नगर ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला आहे. त्यात नगरमधील २१ व नाशिकमधील चार कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यातून रोज साधारण १ लाख १० हजार टनाचे ऊसगाळप होत आहे. आतापर्यंत नगर जिल्ह्यात २८ लाख १७ हजार ६३४, तर विभागात ३० लाख ७४ हजार १४४ टन उसाचे गाळप झाले. तर, २४ लाख साठ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
नगर जिल्ह्यात २३, तर नाशिक जिल्ह्यात ९ साखर कारखाने आहेत. त्यात १३ खासगी कारखाने आहेत. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने नगरमध्ये २१ कारखाने सुरु आहेत. साईकृपा दोन व डॉ. तनपुरे या कारखान्याचे गाळप हंगाम अजून सुरु झालेला नाही. जिल्ह्यात रोज ९० हजार, तर विभागात १ लाख १० हजार टन उसाचे गाळप होत आहे. २५ कारखान्यांपेक्षा तब्बल अठरा कारखान्यात क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप सुरु आहे.
नगर जिल्ह्यात २८ लाख २० हजार उसाचे गाळप झाले आहे. २२ लाख ६० हजार क्विंटल साखऱचे उत्पादन निघाले आहे. विभागात २६ लाख ६० हजार टन ऊस गाळप झाला आहे. आतापर्यंत
सर्वाधिक मुळा, भाऊसाहेब थोरात, वृद्धेश्वर, गंगामाई, अंबालिकाचे ऊसगाळप अधिक आहे.
गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात सरासरी १०.२० टक्के साखर उतारा निघाला होता. यंदा तो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. आतापर्यंत सरासरी ८.०१ साखर उतारा निघाला आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ८ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या अंतिम अहवालानुसार सरासरी १०.४२ साखर उतारा होता.
यंदा उसाचे क्षेत्र अधिक
नगर जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षी ५६ लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले होते. त्या तुलनेत यंदा उसाचे दुप्पट गाळप होण्याचा अंदाज आहे. यंदा एक कोटी टन ऊस विभागात उपलब्ध आहे. इतर भागातून २० लाख टन ऊस विभागात येण्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून वर्तविण्यात आला. साधारण सहा महिने गाळप चालण्याचा अंदाज आहे.