कऱ्हाड, जि. सातारा : राज्यातील बाजारपेठेत पपईला किलोला चार ते पाच रुपये दर मिळत असल्याने, उत्पादन खर्चही निघत नसल्याने सातारा जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पपई नाशवंत असली तरीही दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपईचा तोडाच केलेला नाही. त्यामुळे त्या शेतात तशाच पडून आहेत.
सातारा जिल्ह्यात अलीकडे शेतकऱ्यांनी पपईचे क्षेत्र वाढविले. मात्र काबाडकष्टाने घेतलेल्या पपईची बाजारपेठेत वाढलेली आवक आणि इतर राज्यांतून मागणी नसल्याने उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सध्या सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारे सात ते बारा रुपये किलोचा दर सध्या चार ते पाच रुपयांवर आला आहे. परिणामी, पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपई केली आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळीराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्न आहे. पपई नाशवंत असल्याने पपई जास्त काळ शेतात राहिली तर ते वाया जाणार आहे. असे असले तरीही पपई तोड्याचाही खर्च सध्याच्या दरातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यापासून केला नाही.
शासनाने हमी घेण्याची गरज
शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी फळबागांकडेही वळत आहे. मात्र त्यांना फळे आल्यावर किमान उत्पादन खर्च तरी निघावा एवढा दर मिळेल याची खात्री शासनाने घेण्याची गरज आहे. ती न घेतल्याने अनेक पपई उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजाराही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासन सांगतेय फळबागेकडे वळा. त्याप्रमाणे शेतकरी फळबागेकडे वळल्यावर त्याच्या दराची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. सध्या पपईला दरच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने आम्ही दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही.
– जयवंत पाटील, शेतकरी