रिसोड, जि. वाशीम : सध्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढत असून, भावामध्ये तफावत दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. सोयाबीनचे भाव ४ हजार ५०० रुपये असले तरी, प्रत्यक्ष ३ ते ४ हजार रुपयांदरम्यान शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या वर्षी सोयाबीन काढणीच्या काळात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. रब्बी हंगामाच्या खर्चाकरिता तसेच इतर दैनंदिन व्यवहार करण्याकरिता शेतकरी सोयाबीन विकत असल्यामुळे दररोज येथील बाजार समितीत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या बाजारात सतत आवक वाढलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र उच्चतम भाव हा मोजकाच मिळत असून, उर्वरित मालाच्या दरात मोठी तफावत राहत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता.११) येथील बाजार समितीत २ हजार ७५० क्विंटलची आवक झाली. ३ हजार ५२५ ते ४ हजार ३९० असे सोयाबीनचे भाव असले तरी प्रत्यक्षात मात्र, ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये एवढाच दर शेतकऱ्यांना मिळाला. इतक्या मालामधून क्वचित मालाला ४ हजार ३९० रुपयांचा भाव मिळाला आहे.
बियाणे कंपन्यांकडून सोयाबीनची खरेदी?
यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे प्लॉटचे नुकसान झाले आहे. परिणामी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून बियाणे कंपन्या चांगल्या दर्जाचे सोयाबीन सर्रास बाजारातून खरेदी करीत आहेत, अशा प्रकारची चर्चा सर्रास होत आहे. त्यामुळे चांगल्या व मोजक्या सोयाबीनला भाव मिळतो आहे.
प्रतिक्रिया
सोयाबीन एकाच प्रतीचे येत नाही. त्यामुळे सर्व मालाला सारखा भाव मिळत नाही. दररोज बाजार समितीत फेरफटका मारून लक्ष ठेवले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
-विजयराव देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड. जि. वाशीम