औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्यांवर आला आहे. ७५२ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडेठाक आहेत. १८ लघु प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत आजमितीला ९७.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सिनाकोळेगाव प्रकल्प तुडूंब आहे. जायकवाडीत ९८ टक्के, येलदरी ९९ टक्के, सिद्धेश्वर ७३ टक्के, माजलगाव ९८ टक्के, मांजरा ९९ टक्के, ऊर्ध्व पैनगंगा ९७ टक्के, निम्न तेरणा ९८ टक्के, निम्न मनार ९० टक्के, विष्णुपुरी ९० टक्के, निम्न दुधनात ९७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ९५ टक्के, जालनामधील ७ प्रकल्पांत ९८ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ९३ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ६४ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ८९ टक्के, नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांत ९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५२ लघु प्रकल्पांपैकी लातूरमधील ४, तर बीड व औरंगाबादमधील प्रत्येकी एक प्रकल्प मिळून ६ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
औरंगाबादमधील तीन, जालना, बीड, उस्मानाबादमधील ४, लातूरमधील २ व नांदेडमधील १ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पांत ७३ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ७१ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ८५ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ७४ टक्के, उस्मनाबादमधील २०५ प्रकल्पांत ६४ टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ८५ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ८३ टक्के, हिंगोलीमधील २६ लघु प्रकल्पांत ८८ टक्के पाणी आहे.
६७ मध्यम प्रकल्पांत ७५ टक्के उपयुक्त पाणी
६७ मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांपुढे तर ५५८ लघु प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांपुढे आहे. ६ मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, २ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ८३ लघु प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, ५५ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के, ३२ लघु प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.