मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज (ता.३) मतमोजणी होत असून, सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारांचा कौल आजमावण्यात आला. मंगळवारी (ता.१) मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. दिग्गज नेत्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मतदानाचा हक्क बजावला.
कोरोनामुळे यंदा मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. धुळे- नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी अमरिश पटेल यांनी राजीनामा देऊन भाजमध्ये प्रवेश केल्याने येथे पोटनिवडणूक होते आहे. भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या पटेल यांच्यासमोर काँग्रेसच्या आशुतोष पाटील यांचे आव्हान होते.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी दोन तर शिवसेनेने एका जागेवर उमेदवार उभा केला होता. विरोधी भाजप चार जागा लढवीत असून अन्य एका अपक्षाला भाजपने पाठिंबा देऊ केला आहे.
मतदान (प्रमाण टक्क्यांत)
पदवीधर
- औरंगाबाद : ६१.०८
- पुणे : ५०.३०
- नागपूर : ५४.७६
शिक्षक मतदारसंघ
- अमरावती : ८२.९१
- पुणे : ७०.४४
- धुळे-नंदुरबार
स्था. स्व. संस्था : ९९.३१