अमरावती : नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ६० टन संत्रा निर्यात करण्यात आली. त्याकरिता स्थानिकांकडून सरासरी १५ ते ३८ रुपये प्रति किलो या दराने संत्रा खरेदी करण्यात आला.
नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने सालबर्डी येथील नव्या संत्रा ग्रेडिंग व वॕक्सिन प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर ग्रेड ‘ए’ दर्जाचा संत्रा निर्यात केला जातो. या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे संत्रा फळांवर अपेक्षित रंगछटा चढली नाही. शेतकऱ्यांना अवघा सात ते दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. मागणी नसल्याचे कारण देत अनेक व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे खरेदी करार देखील रद्द केले आहेत. त्यामुळे ६० टक्के संत्रा तोडणीविना झाडावरच आहे.
अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या माध्यमातून प्रकल्पस्थळी संत्रा खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूरच्या कळमना बाजार समितीत विक्रीसाठी संत्रा नेण्यासाठीचा वाहतूक खर्च वाचला. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून प्रतिटन शंभर किलो कटनी घेतली जाते. ती देखील शेतकऱ्यांना द्यावी लागली नाही. अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा छुपा ३० टक्के खर्च वाचण्यास मदत झाली.
या वर्षीच्या हंगामात कंपनीकडून १६०० टन संत्रा खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेले आलेल्या संत्र्याची किंमत अडीच कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबई येथील एका निर्यातदारांकडून शेतकरी उत्पादक कंपनीशी निर्यातक्षम फळांचा पुरवठा करण्यासंदर्भात करार करण्यात आला. या माध्यमातून आजवर सुमारे २ कंटेनर दुबईला पाठविण्यात आले. त्याद्वारे ६० टन संत्रा निर्यात करण्यात आली. तिसरा कंटेनर मुंबई मार्गे पुन्हा दुबईला पाठविण्यात येणार आहे. या वेळी देखील २० टन संत्रा निर्यात केला जाईल.
प्रतिक्रिया…
नागपूर मँडरींन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने नव्या ग्रेडिंग, वॅक्सिंन प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे, त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया करण्यात आली. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मुंबई येथील निर्यातदाराच्या सहकार्याने आजवर ६० संत्रा निर्यात करण्यात आली. गुरुवारी पुन्हा २० टनांचा कंटेनर दुबईला पाठविण्यात येणार आहे. निर्यातक्षम संत्रा खरेदी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली त्यासाठी त्यांना सरासरी १५ ते ३० रुपये किलो असा दर देण्यात आला आहे. बाजारात आजच्या घडीला सात ते दहा रुपये असा दर आहे.
– नीलेश रोडे, अध्यक्ष, नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनी , संपर्क : ९४२०७ २१०१७