जळगाव ः खानदेशात अनेक कापूस खरेदी केंद्र सरकी, रुईचा साठा वाढल्याने बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाने (सीसीआय) कुऱ्हा (ता.भुसावळ), जामनेर येथील खरेदी केंद्रे बंद होती. तर सध्या जळगाव, पाचोरा येथील खरेदी केंद्रे बंद आहेत.
‘सीसीआय’च्या जळगाव येथील खरेदी केंद्रे तीन दिवस बंद राहणार आहेत. जळगाव येथे चार जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. हे तिन्ही कारखाने बंद असणार आहेत. सरकी व गाठींचा साठा कमी झाल्यानंतर व सध्या कारखान्यात पडून असलेल्या कापसावर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर नव्याने कापूस खरेदी सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना इतर खरेदी केंद्रांत कापसाची विक्री करावी लागेल.
कापसाच्या विक्रीसाठी शेतकरी ‘सीसीआय’च्या केंद्राला पसंती देत आहेत. अर्थातच ‘सीसीआय’कडे खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळत आहे. सध्या खेडा खरेदीदेखील संथ आहे. ‘सीसीआय’कडे कापसाची आवक चांगली आहे. यामुळे सरकी व रुईचा साठाही लागलीच वाढू लागला आहे.
‘सीसीआय’ने खानदेशात सुमारे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदी वेगात सुरू आहे. कमाल दर ५७२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’ने जळगाव, पाचोरा, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), भुसावळ, बोदवड, पाचोरा, चोपडा येथे खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तर धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथे ‘सीसीआय’ची खरेदी केंद्र आहेत.
बैलगाडीला प्रथम प्रवेश
‘सीसीआय’च्या केंद्रात कापूस आणणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे दोन-दोन दिवस केंद्रात कापूस विक्रीसाठी थांबावे लागत आहे. या स्थितीत बैलगाडीधारक शेतकऱ्यांच्या कापसाची सर्वप्रथम मोजणी करण्याचे धोरण केंद्रात अवलंबले जात आहे. बैलगाड्यांमधील कापसाची मोजणी किंवा खरेदी आटोपल्यानंतर इतर वाहनांना केंद्रात प्रवेश दिला जात आहे, असे सांगण्यात आले.