कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या वतीने उसाची सेंद्रिय शेती व गूळनिर्मितीसाठी गूळ उत्पादकांना मोफत सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली.
कोल्हापुरी पद्धतीने दर्जेदार गूळनिर्मिती, गुळापासून पावडर, क्यूब, मोदक, काकवी, निर्मिती व उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती इच्छुकांना देण्यात येणार आहे. पॅकिंगपासून ते ब्रॅण्डनिर्मितीपर्यंत तसेच लहान व मध्यम प्रकल्प उभारून देण्यापर्यंत संघाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.
सध्या देशात व देशाबाहेर सेंद्रिय गुळाची मागणी वाढत आहे. संस्थेच्या वतीने यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी संस्थेने गुळवे प्रशिक्षण शिबिर घेऊन राज्यातील गुळव्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने गूळनिर्मितीचे धडे दिले आहेत. उसाच्या सेंद्रिय शेतीबरोबर आले, हळद, मिरची कांदा आदि पिकांच्या मार्गदर्शनाबरोबर त्याचे सेंद्रिय सर्टिफिकेट मिळवण्याबाबतही संस्था सातत्याने काम करीत असते. अलीकडच्या काळामध्ये कोल्हापुरी गुळाचे महत्त्व टिकविणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने जास्तीत जास्त प्रमाण गूळ उत्पादकांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळावे यासाठी त्यांना मोफत सल्ला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
कोल्हापुरी गुळाची चव कायम राहावी
कोल्हापुरी गुळाची अस्सल चव कायम राहावी यासाठी सेंद्रिय पद्धत वाढणे गरजेचे असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. ज्या इच्छुक शेतकऱ्यांना याबाबत माहिती हवी आहे. त्यांनी शाहू मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाशी अथवा kpr.shahugul@gmail.com या ई-मेल अॅड्रेसवर संपर्क करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.