पुणे : पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमधील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवत आहेत, असा आरोप करrत शिवसेनेने सोमवारी (ता.१४) साखर संकुलसमोर धरणे आंदोलन केले.
सोलापूर जिल्हा शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोहोळ तालुका शिवसेना प्रमुख अशोक भोसले, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, बाळासाहेब वाघमोडे, नाना भोसले, गणेश लखदिवे सहभागी झाले होते.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा केली. आंदोलक शेतकऱ्यांनी एफआरपी शेतकऱ्यांना मिळावी,
सोलापूर जिल्ह्यातील थकीत एफआरपी त्वरित मिळावी, कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत, कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्या, थकीत ऊस बिले त्वरित मिळवून द्या, आदी मागण्या केल्या.