अमरावती : तत्कालीन भाजप तसेच महाविकास आघाडीकडून कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या. त्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात २६८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये घटनांमध्ये २३ने वाढ झाली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबविण्यात आली. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेमध्ये १ लाख ३३ हजार ९४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले.
त्यापैकी १ लाख १३ हजार ३७० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. ४ हजार ९०७ शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजार २५७ शेतकऱ्यांच्या खात्यात ८०८.४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या नियंत्रणात येतील, अशी अपेक्षा होती.
मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यातच संततधार पाऊस, अतिवृष्टी व महापुराचा पिकांना फटका बसला. निकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन उगवले नाही, कापसावर बोंडसड, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. मूग, उडीद पाण्यामुळे उध्वस्त झाले. बुरशीजन्य रोग वाढीस लागल्याने संत्रा पट्ट्यात फळगळ झाली. परिणामी शेतकऱ्यांचा समोरील आर्थिक संकट अधिक गडद झाले.
परिणामी शेतकऱ्यांच्या नैराश्यात वाढ झाली. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये २३ची वाढ नोंदविण्यात आली. २०१९मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत २४५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, २०२०मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत २६८ शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
- तुलनात्मक स्थिती
- महिना २०१९ २०२०
- जानेवारी २० २४
- फेब्रुवारी १९ २७
- मार्च २४ १४
- एप्रिल १७ १३
- मे २५ २९
- जून २० २९
- जुलै २२ ३१
- ऑगस्ट २९ २५
- सप्टेंबर २६ ३०
- ऑक्टोबर १९ २५
- नोव्हेंबर २४ २१