कोबीवर्गीय भाजीपाला पानकोबी व फुलकोबीवर मावा, चोकोनी ठिपक्यांच्या पतंगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत दिसून येतो. सध्याचे थंड व मध्येच येणारे ढगाळ वातावरण या किडींच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
मावा : (Aphid)
- फिक्कट हिरवा रंग, आकाराने लहान व शरीराने मृदू.
- मादी अंडी देण्याऐवजी सरळ १२ ते २४ पिलांना जन्म देते. त्यांचे ७ ते ९ दिवसांत प्रौढांमध्ये रूपांतर होते. प्रौढ मादी लगेच पिलांना जन्म देण्यास सुरुवात करते.
- प्रादुर्भावाची वेळ : पिकाच्या सुरुवातीपासून पीक काढणीपर्यंत.
- नुकसानीचा प्रकार : पिले व प्रौढ पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. पाने पिवळी होऊन वाळून गळतात.
- या किडीच्या शरीरातून बाहेर पडलेल्या गोड चिकट पदार्थांवर काळ्या बुरशीची वाढ होते. प्रकाशसंश्लेषण क्रियेत बाधा येते. झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट होते.
चौकोनी ठिपक्यांचा पतंग : (Diamond back moth)
- भुरकट रंगाच्या पाकोळी पतंगाच्या पाठीवर चौकोनी पांढरा ठिपका असतो.
- मादी पतंग कोबीवर्गीय पिकांच्या पानाखालील भागात एक-एक अशी ५० ते ६० अंडी घालते.
- ५ ते ६ दिवसांत त्यातून फिक्कट हिरव्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. अळी पिवळसर हिरव्या रंगाची असून, शरीरावर बारीक काळे केस असतात. अळी अवस्था १४ ते १५ दिवसांची असते.
- पानावर ५ ते ७ दिवसांसाठी सुप्तावस्थेत जाते.
- ही कीड मार्चपर्यंत कार्यक्षम असते.
- नुकसानीचा प्रकार : अळी पानांना छिद्रे पाडून त्यातील हरितद्रव्य खाते. अधिक प्रादुर्भावामध्ये पानांची चाळण होऊन पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
एकात्मिक व्यवस्थापन
- प्रादुर्भावग्रस्त पाने दिसल्यास तोडून टाकावीत.
- कोबीच्या २० ते २२ ओळीनंतर मोहरीच्या दोन ओळी लावाव्यात. या झाडांकडे चौकोनी ठिपक्यांचे पतंग ८० ते ९० टक्के आकर्षित होतात.
- एकरी ३ ते ४ कामगंध सापळे लावावेत. त्यात झायलोल्युरचा वापर करावा.
- शेतात एकरी ८ ते १० पक्षिथांबे लावल्यास ते अळ्यांवर नियंत्रण ठेवतात.
- पतंगवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिसची २० हजार अंडी किंवा १ कार्ड ७ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ वेळा प्रति एकरी शेतामध्ये लावावे.
- सुरुवातीला निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. निसर्गतः ढालकिडा, सिरफीड माशी यांसारख्या मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.
आर्थिक नुकसान पातळी
चौकोनी ठिपक्यांच्या पतंगाच्या २ अळ्या प्रति झाड
पीक | कीड | कीटकनाशक (ग्रॅम/ मिलि प्रति लि.पाणी) | प्रतीक्षा कालावधी* (दिवस) |
पानकोबी | चौकोनी ठिपक्यांचा पतंग | इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.३ किंवा | ३ |
स्पिनोसॅड (२.५ टक्के एससी) १.२ किंवा | ३ | ||
क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.१ किंवा | ३ | ||
सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.२ किंवा | ५ | ||
इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.५ किंवा | ५ | ||
फ्ल्युबेंडाअमाईड (३९.३५ एससी) ०.१ | ७ | ||
फुलकोबी | चौकोनी ठिपक्याचा पतंग | स्पिनोसॅड (२.५ एससी) १.२ किंवा | ३ |
पानकोबी | मावा | सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.२ किंवा | ५ |
टीप : कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.
(*प्रतीक्षा कालावधी म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर काढणी करण्यास सुरक्षित असल्याचा काळ. यानंतर पिकाची काढणी करावी. फवारणीनंतर प्रतीक्षा कालावधीआधी काढणी केल्यास भाज्यांमध्ये कीटकनाशकाचा अंश राहू शकतो. ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते.)
संपर्क- डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००
डॉ. बसवराज भेदे, ७५८८०८२०२८
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)