आटपाडी, जि. सांगली ः गतवर्षी डाळिंबाचा आंबेबहार हंगामाचा शेतकऱ्याने भरला. त्याची नुकसान भरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरले आहेत. दिघंची मंडलसाठी ५४ हजार, तर आटपाडी मंडलासाठी २४ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंकेतील खात्यांवर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.
गतवर्षीच्या आंबेबहरात तालुक्यात अंदाजे तीन हजार हेक्टर क्षेत्राचा हंगाम डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी धरला होता. साधारण हा हंगाम एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान धरला जातो. त्यासाठी ३१ डिसेंबरअखेर विमा भरला जातो.
कृषी विभागाच्या आवाहनानंतर तालुक्यातील आटपाडी आणि दिघंची मंडलच्या शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०१९ अखेर आंबे बहराचा विमा भरला होता. विमा रकमेच्या पाच टक्के हिस्सा हेक्टरी ६५०० रक्कम शेतकऱ्यांनी भरला होता. या हंगामाला तीव्र उष्णतेचा आणि पावसाचा खंड याचा फटका बसला होता. त्यामुळे काही शेतकरी विमा नुकसान भरपाई पात्र ठरले होते.
शेतकऱ्यांची संख्येची माहिती नाही
दर वर्षी आंबे बहरातील शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मंजूर झालेली विमा रक्कम मिळते. यावर्षी विलंब झाला. सप्टेंबरपर्यंत विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संभ्रमावस्था होती. अखेर विमा रक्कम मंजूर झाली. याबाबत अद्याप शेतकऱ्यांची संख्या, क्षेत्र आणि रक्कम याची माहिती कृषी विभागाकडे आलेली नाही.