नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी संशोधन करत आहे. या केंद्रावर कांदा व लसूण पिकांचे संशोधन सुरू असून बीजोत्पादनही घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या बियाण्यांचा वापर करताना सोबतीला पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राला डॉ. ढवण यांनी भेट देत पाहणी केली. या भेटीदरम्यान कुलगुरूंनी प्रक्षेत्राची पाहणी करून पिकांबाबत माहिती घेतली. केंद्राचे प्रमुख डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी स्वागत केले. यावेळी विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय कुसळकर, कृषी संशोधन केंद्र निफाडचे गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यावेळी उपस्थित होते.
केंद्राचे प्रमुख डॉ. जितेंद्र यांनी १९५९ पासून संशोधन केंद्रावर झालेल्या संशोधन कार्याचा आढावा यावेळी मांडला. तसेच हे संशोधन केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मंगेश बडगुजर, डॉ. राकेश सोनवणे, कमलाकर जाधव यांनी सुरू असलेल्या कांदा, लसूण व द्राक्ष संशोधनसंबंधी उपक्रमाची माहिती कुलगुरूंना दिली.