सोलापूर : यंदाच्या ऊस गाळप हंगामात सोलापूर विभागातील ३९ साखर कारखान्यांनी १०५.०९ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ९२.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यंदाच्या हंगामातील गाळप, उतारा व साखर उत्पादनात कोल्हापूरनंतर सोलापूर विभागाने आघाडी घेतली आहे.
यंदा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी आणि महापुराच्या स्थितीतून हंगाम काहीसा अडखळत पुढे सरकला. पण त्यानंतर ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला आहे. अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासह विभागातील कारखान्यांनी चांगले गाळप केले आहे.
सोलापूर विभागात सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. यंदा जिल्ह्यातील २७ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांत गाळप हंगाम सुरू आहे. त्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातील २७ कारखान्यांत ८२ लाख ४६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७२ लाख ८० हजार ५६६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यामध्ये ९ सहकारी व १८ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
खासगी १८ साखर कारखान्यांनी ५०.९५ लाख टन उसाचे गाळप करून ४३.३३ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. नऊ सहकारी साखर कारखान्यांनी ३१.५० लाख टन उसाचे गाळप करून २९.४७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
एफआरपीत पिछाडी
सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली असली, तरी एफआरपीत मात्र पिछाडी असल्याचे दिसते. खासगी कारखान्यांनी आतापर्यंत १ हजार ८०० ते दोन हजार रुपये तर सहकारी साखर कारखान्यांनी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांची आगाऊ रक्कम दिली आहे. पण, एफआरपीप्रमाणे एकाही कारखान्याने एकरकमी पैसे दिलेले नाहीत.
उताऱ्यात घट
खासगी कारखान्याचा उतारा यंदा सरासरी ८.५० टक्के इतका आहे. तर सहकारी कारखान्यांचा उतारा सरासरी ९.३६ टक्के इतका आहे. परंतु दर वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उताऱ्यात घट झाल्याचे दिसते. सरासरी १० ते ११ टक्केच्या पुढे कारखान्यांचा साखर उतारा असतो. पण यंदा जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने पाण्याचे प्रमाण उसात अधिक राहिले. त्यामुळे उताऱ्यात घट झाल्याचे सांगण्यात येते.