सायगाव, जि. सातारा : धोम कालव्यातून नेहमी होत असलेली गळती, कालव्यातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे जावळी तालुक्यात सायगाव विभागातील सुमारे ४० एकर बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर कालवा फुटण्याचा
धोका आहे.
खर्शी, सायगाव, महामुलकरवाडी या गावांच्या शिवारातून जाणाऱ्या या कालव्याची गेल्या वर्षी दुरुस्ती करून डागडुजी केली होती. पण, मोठ्या प्रमाणात गळती होऊन कालव्यात पाणी आले की आजूबाजूला पिके असणारी शेतजमीन पाण्याने तुडुंब भरली जात आहे. या शेतात दोन-दोन महिने पाणी साचून राहिल्याने शेती निकृष्ट झाली आहे.
जमीन कठीण झाल्याने पेरणीही करता येत नाही. गेल्या दीड महिन्यापासून कालव्यामध्ये सोडण्यात आलेले प्रमाणापेक्षा जास्त पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर येऊन कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी बाहेर पडून शेतीचा परिसर पाण्याने तुडुंब झाला आहे. या पाणी गळतीचा सर्वांत जास्त फटका हा महामुलकरवाडी व रायगावच्या शेतकऱ्यांना
बसला आहे.
सततच्या पाण्यामुळे शेतात गहू, हरभरा, ज्वारी व इतर बागायती पिके करताना विचार करावा लागतो. कारण, इथून कोणतेही उत्पन्न निघत नाही. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई द्यावी, अशीही मागणी प्रमोद काकडे, प्रवीण पवार यांनी केली.
अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर
गतवेळी निकृष्ट काम चालू असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा ग्रामस्थांनी काम थांबविले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करून गळती काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतेही काम न होता वर्षभरात पुन्हा गळती सुरू झाल्याने या कामाला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.