नगर: ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची शनिवारी (ता. १६) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पीक कर्जवाटप, विविध योजनांसाठी केलेले कर्जवाटपाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नचित, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, रिझर्व्ह बँक प्रतिनिधी सिंदकर, नाबार्डचे जिल्हा उप महाव्यवस्थापक शीतलकुमार जगताप उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, ‘‘जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तसेच सूचनांची माहिती तालुका स्तरावर संबंधितांनी पोहोचवावी. जेणेकरून, तातडीने त्यावर अंमलबजावणी होऊ शकेल.“
बँकांच्या कामगिरीवर नाराजी
प्रत्येक बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट यापूर्वीच देण्यात आले. बँकांनी ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खरीप हंगामात ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्याबाबत नाराजी व्यक्त करून रब्बी हंगामात या बँकांनी त्यांच्या कामगिरीत सुधारणा कराव्यात, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.