पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याला काही भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. सोमवारी (ता.४) सायंकाळी बारामती परिसरात हलका पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांच्या नुकसानीबरोबरच विविध ठिकाणी भाजीपाला पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, दाट धुके यामुळे ज्वारी पिकांना फटका बसत आहे. त्यातच वाढीच्या व कणसाच्या अवस्थेतील ज्वारीवर चिकटासारख्या रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली.
ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध अळ्यांनी आक्रमण केले आहे. सततचे बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे.
यंदा उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या केल्या आहेत. गहू, हरभरा ही पिकेही वाढीच्या अवस्थेत आहे. तुरीची काढणी सुरू आहे. याशिवाय आंबा मोहोराच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामानामुळे गव्हावर तांबेरा, कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.
उत्पादन घटणार
ढगाळ हवामान, धुके, वाऱ्याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे कांदा, गहू, ज्वारी, बटाटा, हरभरा पिकांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्के उत्पादनात घट येण्याचा अंदाज शिरूर तालुक्यातील कर्डे येथील शेतकरी भाऊसाहेब पळसकर यांनी सांगितले.