वाशीम : जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कार्यालय वाशीम येथे सुरू करावे, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २९) वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत निवेदन दिले.
देसाई जिल्हा दौऱ्यावर असताना आमदार अमित झनक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या उपस्थितीत जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दिलीप फुके, उपाध्यक्ष विलास गायकवाड, सचिव पंजाबराव अवचार यांनी निवेदन दिले. या वेळी रवींद्र बोडखे, शिवाजी भारती, माणिक अवचार व शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यापीठातील बियाणे खरेदी करते वेळेस घेतली जाणारी अनामत रक्कम तसेच रॉयल्टी रद्द करावी, जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना जवळच्या एमआयडीसी क्षेत्रात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. वाशीम जिल्ह्याची स्थापना झाली तेव्हापासून जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालय नाही.
वाशीम जिल्ह्यात एकूण ४४ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आत्मा, नाबार्ड, एमएसीपीमार्फत झालेली आहे. यामध्ये ८० टक्के बीजोत्पादन वाशीम जिल्ह्यातील बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत केले जाते. २० टक्के बीजोत्पादन अकोला जिल्ह्यात केले जाते, असे असतानाही बीज प्रमाणीकरणाचे कार्यालय वाशीममध्ये नाही. याचा खूप त्रास सहन करावा लागतो.
विद्यापीठातील बियाणे खरेदी करते वेळेस अनामत रक्कम तसेच २० टक्के रॉयल्टी लावली जाते. ती रद्द करावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना त्यांच्या जवळील एमआयडीसी क्षेत्रात जागा उपलब्ध करून दिली जावी. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल शेतकरी उत्पादक कंपनीच्या गोदामात, कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवून ठेवता येईल. अन्नधान्याची, भाजीपाला, फळांची होणारी नासाडी वाचवता येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

वाशीम (प्रतिनिधी) : जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कार्यालय वाशीम येथे सुरू करावे, यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २९) वाशीम जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेत निवेदन दिले.