नगर ः यंदा राज्यात आतापर्यंत खासगी व सहकारी मिळून १७९ साखर कारखान्यांकडून सुमारे चार कोटी वीस लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत तीन कोटी ९९ क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत सोलापूरमधील विठ्ठलराव शिंदे व कोल्हापूरमधील जवाहर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप केले आहे.
आतापर्यंत राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून २ कोटी २४ लाख ९० हजार टन तर खासगी कारखान्यांकडून १ कोटी ९५ लाख ५० हजार टन उसाचे गाळप झाले आहे. माढा येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने शुक्रवारपर्यंत ८ लाख ३२ हजार १८७ टन गाळप करून सात लाख ४४ हजार शंभर क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कोल्हापुरातील जवाहर कारखान्याने ७ लाख ६ हजार ४०० टनांचे गाळप केले आहे.
राज्यात सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी उतारा ९.८१ टक्के, तर खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.०८ आहे. कोल्हापूर, पुणे विभाग ऊसगाळपासोबत उताऱ्यातही पुढे आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ११.०३ टक्के, तर पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा ९.०९ टक्के आहे. नागपूर विभागाचा साखर उतारा सर्वांत कमी आहे.
विभागनिहाय ऊसगाळप आणि साखर उत्पादन
गाळप (लाख टनांत), उत्पादन (लाख क्विंटल)
नगर | ६३.३ | ५४.७४ |
कोल्हापूर | ९६.८६ | १०६.७९ |
औरंगाबाद | ३५.२४ | २९.८ |
सोलापूर | ९३.८१ | ८१.९३ |
पुणे | ९३.५९ | ९२.६१ |
नांदेड | ३३.६० | ३०.३ |
अमरावती | ३.१९ | २.५८ |
नागपूर | १.२ | ०.८० |