सातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन दिवस उमेदवारांच्या हृदयात धाकधूक होती. पण, कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करण्यास आसुसलेले होते. त्यामुळेच सोमवारी सकाळी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली अन् ग्रामपंचायतींचा एक एक निकाल बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी केलेल्या विजयाच्या जल्लोषाने वातावरण भरून गेले.
जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच उत्साहाने झाल्या. काही ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध, तर काही अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, जेथे जेथे मतदान झाले तेथे विजयासाठी मोठी चुरस होती. चुरशीमुळे मतदानाची टक्केवारीही सर्वच ठिकाणी ८० च्या पुढे होती. या निवडणुका पक्ष पातळीवर न होता स्थानिक आघाड्यांवर झाली होती. अनेक गावात एकाच नेत्याच्या दोन गटात निवडणूक झाली होती. शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या दोन तासांतच अनेक ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर येते गेले.
ग्रामीण भागातून कार्यकर्ते वाहने घेऊन तालुक्याच्या ठिकाणी सकाळीच पोचले होते. कऱ्हाड उत्तरमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्याची सरशी झाली आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये संमिश्र निकाल लागला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (कै.) विलासराव पाटील- उंडळाकर, तर भाजपचे अतुल भोसले या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांना संमिश्र यश मिळाले आहे. पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शुंभूराज देसाईच्या गटाने सरशी घेतली आहे.
सातारा-जावळी मतदार संघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. कोरेगाव मतदार संघात आमदार महेश शिंदे यांच्या गटाने निकाल आघाडी घेतली आहे. फलटण मतदार संघात अनेक गावात रामराजे नाईक-निंबाळकर गटाने बहुतांशी गावात सत्ता कायम ठेवली आहे. माण मतदार संघात आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, शेखर गोरे यांच्या गटाना संमिश्र यश मिळाले आहे. वाई मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटांची सरशी झाली आहे. जिल्ह्यातील गुंळुब, केंजळ ओझर्डे, पसरणी, पाल, कोंडवे, लासुर्णे, निढळ, कलेढोण, तारळे, पुसेगाव, जावली आदी प्रमुख ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.