जळगाव ः खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त अद्याप झालेला नाही. हरभरा विक्रीसाठी सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. परंतु हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. पुढील आठवड्यात काही केंद्र सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी साडेचार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धुळ्यातही सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावाच्या जवळपास होते. परंतु सध्या दर ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल, एवढे आहेत. यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणीधारक शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.
शासकीय दर ५१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत. जळगाव जिल्ह्यात १४ व धुळ्यात पाच खरेदी केंद्र निश्चित आहेत. या केंद्रांमध्ये सुमारे २५ दिवस शेतकऱ्यांकडून हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करून घेण्यात आली. नोंदणीला चांगला प्रतिसात लागल्यानंतर खरेदीचे नियोजन प्रशासनाने केले होते. नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभला. परंतु खरेदीचे नियोजन झालेले नाही. बाजारातही दरात किरकोळ घसरण दिसत आहे. यामुळे शासकीय खरेदीची मागणी केली जात आहे.
खरेदीबाबत संभ्रम
खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी झाली होती. खरेदी केंद्र संख्या पुरेशी आहे. पण खरेदी सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्यासाठी स्वतंत्र दर नाहीत. त्याचे दर बाजारात ८५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. यामुळे शासकीय केंद्रात काबुली हरभऱ्याची कोणतीही आवक होणार नाही, अशी स्थिती आहे. फक्त देशी, देशी सुधारित, देशी संकरित प्रकारच्या हरभऱ्याची आवक शासकीय केंद्रात होईल, असे चित्र खानदेशात आहे.
काही खरेदी केंद्र या आठवड्यात सुरू होतील. काही पुढील आठव़ड्यात सुरू केले जातील. खरेदीची तयारी झाली आहे. साडेचार हजार शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.
– गजानन मगरे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन