जळगाव ः कापूस गाठींच्या उत्पादनात गुजरातने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. देशात सर्वाधिक ९२ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन गुजरातने साध्य केले आहे. यातच महाराष्ट्रातील उत्पादन सुमारे १३ लाख गाठींनी घटले असून, ८३ लाख गाठींचे उत्पादन हाती आल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.
कापूस लागवडीत महाराष्ट्र देशात किंवा जगात आघाडीवर आहे. चीन, अमेरिकेपेक्षा अधिकची लागवड महाराष्ट्रात केली जाते. ही लागवड गेले दोन हंगाम ४३.५० लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. परंतु राज्यातील कापसाखालील फक्त २० ते २३ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय अनेकदा दुष्काळी स्थितीचा फटका बसतो. तर गेले दोन वर्षे अतिपावसासह गुलाबी बोंड अळीने मोठे नुकसान राज्यातील कापसाचे झाले आहे.
तुलनेने गुजरातेत कापूस लागवड कमी आहे. तेथे गेल्या वर्षाच्या तुलनेत लागवड २०२०-२१ च्या हंगामात सुमारे पाच लाख हेक्टरने घटली होती. तेथे २१ लाख हेक्टरवर कापूस पीक होते. म्हणजेच देशात तेलंगण व आंध्र प्रदेशात मिळून जेवढी कापूस लागवड होते, त्यापेक्षा कमी लागवड गुजरातेत होत आहे. परंतु गुजरातमधील कापसाखालील ५५ टक्क्यांवरील क्षेत्र ओलिताखाली आहे. शिवाय तेथे कृषी विद्यापीठे, खासगी कंपन्या व इतर यंत्रणांच्या मदतीने गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. यामुळे गुजरातची उत्पादकता व उत्पादन टिकून आहे. परंतु तेथे लागवड घटल्याने उत्पादन या हंगामात सुमारे १२ लाख गाठींनी कमी झाले आहे.
गुजरातमध्ये वस्त्रोद्योगही वाढला आहे. तेथे कापूस, रुई, सुताची मोठी मागणी आहे. सुमारे १५३ सूतगिरण्या तेथे कार्यरत आहेत. कापड बाजारही गुजरातेत मोठा आहे. परिणामी, तेथे कापसाची परराज्यांतून आयात केली जाते. ही आयात महाराष्ट्रातून अधिक केली जाते. शिवाय राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणातूनही गुजरातेत कापसाची आयात केली जाते. कापूस आयात करून तेथे त्यावर प्रक्रिया म्हणजेच रुई व सूतनिर्मिती केली जाते. यामुळे गुजरातमधील कापूस गाठींचे उत्पादन दरवर्षी देशात अधिक दिसत आहे, अशी माहिती मिळाली.
देशात यंदा कापूस गाठींच्या उत्पादनाबाबत वेगवेगळे अंदाज अद्यापही व्यक्त केले जात आहेत. परंतु जाणकारांच्या मतानुसार देशात यंदा ३२५ ते ३३० लाख गाठींचेच उत्पादन हाती येईल. मार्चच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात २९० लाख गाठींची आवक झाली आहे. पुढे आणखी ३५ लाख गाठींची आवक होऊ शकते, असे सांगण्यात आले.
देशातील उत्पादनाची स्थिती (उत्पादन गाठींमध्ये, एक गाठ १७० किलो रुई)
राज्य : उत्पादन
महाराष्ट्र : ८३
गुजरात : ९२
तेलंगणा : ५१
उत्तर भारत (राजस्थान, पंजाब व हरियाना मिळून) : ७०
प्रतिक्रिया
देशात गुजरात कापूस गाठींच्या उत्पादनात प्रथम आहे. पण तेथील कापूस उत्पादन कमी आहे. कारण तेथे लागवड घटली आहे. जेवढे उत्पादन तेलंगण व आंध्र प्रदेशात मिळून घेतले जाते तेवढेच कापूस उत्पादन गुजरातेत घेतले जाते. परंतु गुजरातमधील कारखाने, उद्योगात कापसाची किंवा कच्च्या मालाची मोठी आयात केली जाते. त्यावर तेथे प्रक्रिया केली जाते. यामुळे तेथील कापूस गाठींचे उत्पादन अधिक दिसते. तेथे यंदा ९२ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. तर राज्यात उत्पादन घटले असून, ते ८३ लाख गाठी एवढे दिसत आहे.
– अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती)

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.