जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले. परंतु नुकसानीसंबंधीच्या मदतीस पात्र असूनही काही गावांमधील शेतकऱ्यांच्याच याद्या तहसीलदार कार्यालयात सादर झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये पंचनामे न करता नुकसानच झाले नाही, असे गृहीत धरून नुकसानग्रस्तांच्या याद्याच तहसील कार्यालयात सादर केलेल्या नसल्याचे समोर आले आहे.
वर्षभर शेतकरी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. मार्चमध्ये जळगाव तालुक्यात कठोरा येथे सर्वाधिक गारपीट झाली. अर्धा तास गारा पडल्या व तासभर सुसाट वारा, पाऊस झाला. किनोद, भादली खुर्द, भोकर, सावखेडा खुर्द, करंज, पिलखेडा, कानळदा, फुपनगरी येथेही गारा पडल्या. अर्धा तास सुसाट वारा होता. यात गहू, बाजरी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु नुकसानग्रस्तांच्या यादीत फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द येथील शेतकऱ्यांचा समावेशच केला नाही.
या गावांमधील केळी उत्पादकांना फळ पीकविमा योजनेतून गेल्या वर्षातील गारपीट, वादळात नुकसानीसंबंधी काही दिवसांपूर्वीच भरपाई मिळाली. केळी उत्पादकांना भरपाई मिळते. मात्र मका, गहू उत्पादकांना भरपाई का मिळत नाही. याबाबत फुपनगरी, खेडी खुर्द भागातील कृषी सहायक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
नुकसानभरपाई न मिळाल्यास तहसीलदार, पालकमंत्री यांना निवेदन सादर करू व घेराव घालू, असा इशारादेखील दिला आहे. चोपडा तालुक्यातही खेडी भोकरी, गोरगावले, गरताड, धनवाडी येथे मोठी हानी वादळ, गारपिटीत झाली होती. परंतु या भागातील अनेक शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत नाहीत. या भागातही शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत रोष आहे.
केळी लागवड सुरू होणार
केळीचे दर यंदा स्थिर आहेत. यामुळे पुढे मे, जून महिन्यात केळी लागवड वाढेल, असे संकेत आहेत. मे, जून महिन्यातील केळीला मृग बाग किंवा मृग बहार केळी म्हणून खानदेशात ओळखले जाते. या केळीची लागवड जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात अधिक केली जाते.
नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागातही या केळीचे क्षेत्र अधिक असते. ही लागवड करण्यासाठी शेतकरी केळी रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. केळी दर सध्या किमान ७०० व कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे दरावर दबाव होता. पण यंदा कोरोना काळात केळीला चांगली मागणी आहे. यामुळे केळी लागवड वाढेल, अशी स्थिती आहे.