नवी दिल्ली : भारतात कोरोना महामारीचा धोका अजून कायम असून देशातील लहान शहरांत कोरोना चाचण्यांना व लसीकरणालाही वेग देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार (ता.१७) केली. देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरले तर परिस्थिती नियंत्रणात आणणे फार कठीण होईल असाही त्यांनी इशारा दिला.
देशाच्या अनेक राज्यांत कोरोनाची परिस्थिती पुन्हा गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रासह 16 राज्यांतील त्यातही पश्चिम भारतातील 70 जिल्ह्यांत नव्या रूग्णवाढीचे प्रमाण दीडशे टक्क्यांवर पोचले आहे. एकूण रूग्मांपैकी सुमारे 60 टक्के रूग्ण एकट्या महाराष्ट्रातील असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या बैठकीत सहभागी झाले नव्हते. महाराष्ट्राचे मुक्यमंत्री उध्दव ठाकरे सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदींनी या बैठकीत लसीकरणाचा वेग वाढविण्याच्याही सूचना दिल्या. लसीकरण हे या लढाईतील प्रबावी हत्यार आहे. त्यामुळे लसींचो डोस वेळेत न वापरता ते वाया घालवण्याबाबतही त्यांनी उत्तर प्रदेशासह काही राज्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की कोवीड 19 विरूध्द लढाईत भारताचे उदाहरण जगभरात दिले जाते. त्यामुळे कोरोना रूग्णवाढीचा पुन्हा दिसणारा कल चिंताजनक आहे. या महामारीला पुन्हा पसरण्यापासून आताच अटकाव करायला हवा. राज्य सरकारांनी छोट्या शहरांत चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. या लढाईत अती आत्मविश्वास व बेपर्वाई दाखवून चालणार नाही. त्याच वेळी जनतेत घबराट उडेल असेही काही राज्यांनी करू नये. नव्या चाचणी केंद्रांबरोबरच लसीकरण केंद्रेही वाढवायला हवीत. प्रत्येक संक्रमित कोरोना रूग्णाचा कमीत कमी कालावधीत माग काढून आरटी पीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांवर नेण्याची अत्याधिक गरज आहे. देशाच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होण्यापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाय करण्याची आवश्यकता आहे.