कोल्हापूर : बरोबर एक वर्षानी लॉकडाउनच्या कटू आठवणी भाजीपाला शिवाराला उद्विग्न करत आहेत. राज्यात भराभर बंद होणाऱ्या बाजार समित्या आणि पुन्हा लॉकडाउनचे संकट भाजीपाला उत्पादकांच्या अडचणी वाढवत आहे. याच मानसिकतेतून जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक पुन्हा भाजीपाला काढून फेकत असल्याचे वेदनादायी दृष्य दिसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाच्या संकटात पुन्हा वाढ होत आहे. भाजीपाला जिल्ह्यात पिकत असला तरी त्याची बाजारपेठ राज्यभरात आहे. मात्र मुंबई, पुणे या हक्काच्या बाजारपेठांत फ्लॉवर, कोबीच्या दरात अचानक घसरण झाली आहे. लॉकडाउनच्या भीतीने व्यापारी भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोबीसारख्या पिकाला किलोला एक ते दोन रुपये इतका नीचांकी दर मिळत आहे.
उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कोणताही विचार न करता भाजीपाला काढून फेकण्यास प्रारंभ केला आहे. याच मानसिकतेतून भाजीपाला पट्यातील शेतकरी भाजीपाला कापून फेकत असल्याचे चित्र आहे. हजारो रुपये खर्च करून शेकड्यातही रक्कम मिळत नसल्याने भाजीपाला काढून तो बाजारपेठेत परवडणे केवळ अशक्य झाल्यानेच कोबीसारखा भाजीपाला काढून टाकावा लागत असल्याची प्रतिक्रिया नांदणी (ता.शिरोळ) येथील भाजीपाला उत्पादक बाबासाहेब कुगे यांनी दिली.
कोरोनावाढीच्या दररोज येणाऱ्या बातम्या उत्पादकांच्या मनात भीती उत्पन्न करीत आहेत. कोरोनापेक्षा लॉकडाऊनच भयानक असल्याने नजीकच्या महिन्याभरात शिवारात उभ्या असणाऱ्या भाजीपाल्याचे अस्तित्व अनिश्चित असल्याचे भाजीपाला उत्पादकांनी सांगितले.
…जणू छातीवरच वार
शिवारात शेतकरी पिकांची काढणी करतनाचा एक व्हिडिओ माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विट केला आहे. सपासप असे होणारे कोयत्याचे वार काळीज चिरत आहेत. असे वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी या व्हिडिओसोबत दिली आहे.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.