नगर : अर्बन बॅंकेतील अडीच कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने बॅंकेचे अध्यक्ष, माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह अकरा जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
अर्बन बॅंकेच्या मुख्यालयातून मार्कट यार्ड शाखेत अडीच कोटींची रक्कम पाठविली होती. प्रत्यक्षात ही रक्कम या शाखेला मिळालीच नाही. मुख्य कार्यालयातील शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने म्हणणे मांडण्यासाठी, तसेच कागदोपत्री पुरावे सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने अकरा जणांना नोटिसा बजावल्या आहेत.
माजी खासदार दिलीप मनसुखलाल गांधी, अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, नगर), अजय अमृतलाल बोरा (ख्रिस्त गल्ली), दीपक अमोलकचंद गांधी (बुरुडगाव रस्ता), शैलेश सुरेश मुनोत (वाकोडी रस्ता), किशोर हिम्मतलाल बोरा (ख्रिस्त गल्ली), संजय पोपटलाल लुणिया (ब्राह्मणगल्ली, भिंगार), ॲड. केदार गोविंद केसकर (सर्वोदय कॉलनी), साधना नंदकुमार भंडारी (कोठी रस्ता), मनेष दशरथ साठे (माळीवाडा), नवीनचंद गांधी (सावेडी) यांचा त्यात समावेश आहे.