पुणे : नगर : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यासह आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी जनावरांचा मृत्यू झाला. अशा ६९ पशुपालकांना ४ लाख ९४ हजार रुपयांची मदत केली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना ही मदत नुकतीच देण्यात आली.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात साथीचे रोग, वीजेचा धक्का, विषबाधा व तसेच अन्य वेळी वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
अनेक वेळा साथीच्या आजारांसह अन्य कारणांमुळे पशुधन दगावल्यास शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. यासाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. अशी योजना राबविणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली आहे.
– राजश्री घुले, जिल्हा परिषद अध्यक्षा, नगर.