नांदेड : अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी, याकरिता पाच जानेवारी, २०२१ रोजी सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठत ७५ दिवसांच्या आत शंभर गाड्या रवाना केल्या आहेत. या रेल्वेने नगरसोल येथून आजपर्यंत देशाच्या विविध भागात ३३ हजार ८८५ टन कांदा आणि १९० टन द्राक्षे पाठविली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना किसान रेल्वेचा चांगला उपयोग झाला. यातून नांदेड रेल्वे विभागास १५ कोटी ८० लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी दिली.
उपिंदर सिंग यांनी शंभराव्या किसान रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुक्रवारी (ता. २०) नगरसोल येथून गौर मालडा, पश्चिम बंगालला रवाना केले. या प्रसंगी वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. चंद्रशेखर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक ए. श्रीधर उपस्थित होते.
किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० टक्के सूट देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून ही किसान रेल्वे सुरू करण्याकरिता संबंधित अधिकारी प्रयत्न करीत आहेत. या ५० टक्के सुटीचा इतर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी, व्यापाऱ्यांना लाभ घ्यावा, असे आवाहन उपिंदर सिंग यांनी केले आहे.
कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. पाच जानेवारी, २०२१ रोजी सुरू झालेली किसान रेल्व ७५ दिवसांत शंभर गाड्या रवाना केल्या आहेत. नगरसोल येथून आजपर्यंत देशाच्या विविध भागात ३३ हजार ८८५ टन कांदा आणि १९० टन द्राक्षे पाठविली आहेत. यातून नांदेड रेल्वे विभागास १५ कोटी ८० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. नांदेड रेल्वे विभागातून पहिली किसान एक्सप्रेस (ता. पाच) जानेवारी, २०२१ला नगरसोल येथून सोडण्यात आली.