नाशिक : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ५ हजार ७०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ज्यामध्ये सटाणा तालुक्यात गारपिटीचा फटका अधिक असून कांदा, द्राक्ष डाळिंब या पिकांसह गहू, हरभरा व मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
यंदा शेतकरी खरीप हंगामात अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडला. त्यामुळे प्रामुख्याने कांदा पीक अडचणीत सापडले होते. तर आता रब्बी हंगामाच्या अखेरीस अवकाळीसह झालेल्या गारपिटीमुळे उन्हाळ कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर द्राक्ष व डाळिंब पीक अडचणीत सापडले आहे. तसेच अनेक ठिकाणी गहू व मका पीक आडवे, तर हरभरा मातीमोल झाला आहे. तर काही अंशी पपई लागवडी नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत.
सटाणा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दुसऱ्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढत्या असताना पुन्हा येथे ४ हजार हेक्टरवर फटका बसला आहे. तर सिन्नर, मालेगाव, कळवण व निफाड तालुक्यांत हे नुकसान अधिक आहे.
द्राक्ष हंगाम काढणीच्या अवस्थेत असताना निफाड तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. यासह दिंडोरी व सिन्नर तालुक्यांत अनेक भागांत अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे हे नुकसान मोठे आहे. तर सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात डाळिंब बागांत अधिक नुकसान आहे. तर मालेगाव तालुक्यातही हे नुकसान असून येथे पपई पिकाचेही नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यात झाले असून ४७ गावांना फटका बसला आहे. तर ५०७३ शेतकरी प्रभावित झाले असून, त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
असे आहे नुकसान (हेक्टर)
५७०२
बाधित क्षेत्र
८६
बाधित गावे
७५२१
बाधित शेतकरी
पीकनिहाय प्राथमिक नुकसान असे (हेक्टरी)
पीक : क्षेत्र
गहू: १९६
मका: ११५
हरभरा: ४४.१०
बाजरी: १२
कांदा: ४९६६
भाजीपाला व इतर: ४४
द्राक्ष: २०६
डाळिंब: ११०
पपई: ४
टरबूज व इतर वेलवर्गीय फळे: ५