पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच हवेली, शिरूर, खेड, जुन्नर अशा काही ठिकाणी वादळी पावसासह गारांचा पाऊस पडत असल्याने गहू, हरभरा, ज्वारी, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची भीती असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी पडत आहे. त्यातच मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊसही पडत आहे. सोमवारी सायंकाळी जुन्नर, हवेली, दौड, शिरूर, खेड तालुक्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. यामुळे गहू, हरभरा पिकांना फटका बसत आहे. त्यातच ही पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे.
ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या रब्बी पिकांवर विविध अळ्यांनी आक्रमण केले. सततचे बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून, फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यातच सकाळी काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत असून, त्याचा परिणाम पिकांवर होत आहे.
यंदा उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या केल्या. मार्च महिना सुरू असल्याने पिके वाढीच्या व काढणीच्या अवस्थेत आहेत. तर रब्बी ज्वारी, गहू, हरभरा ही पिकेही काढणीच्या अवस्थेत आहे. या शिवाय आंबा मोहोराच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ हवामानामुळे थंडी कमी अधिक होत असल्याने पिकांवर प्रामुख्याने कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रादुर्भावामुळे अळ्या, रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. या बरोबरच भाजीपाला व फळबागांना देखील फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात
घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.