औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतो आहे. २२ जानेवारीअखेरच्या तुलनेत २२ मार्च अखेर ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १९ टक्क्यांनी घटला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यात मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधारे मिळून ८७६ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा क्षमता ८१७९.७७ दलघमी इतकी आहे. २२ मार्चअखेरच्या अहवालानुसार मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ४६८१.७४ दलघमी उपयुक्त पाणी शिल्लक आहे. जो संकल्पित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५७.२४ टक्केच आहे. हा उपयुक्त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ७६.५३ टक्के इतका होता. जवळपास १९. २९ टक्क्यांची घट उपयुक्त पाणीसाठ्यात नोंदली गेली आहे.
२२ जानेवारीअखेर तसेच २२ मार्चअखेर प्रकल्पांत शिल्लक उपयुक्त पाणीसाठ्याचा विचार करता ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ८४.५४ टक्क्यांवरून ६७.७६ टक्यांवर आला. ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ७३.०८ टक्क्यांवरून ४९.७० टक्क्यांवर, ७५२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा ५५.२९ टक्क्यांवरून ३३.१६ टक्क्यांवर, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ६५.८२ टक्क्यांवरून ४५.३५ टक्क्यांवर, तर तेरणा, मांजरा, रेणा प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ९३.७३ टक्यांवरून २५.७० टक्क्यांवर येऊन पोचला. मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पात केवळ ३३ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत सर्वात कमी २१ टक्केच उपयुक्त पाणी आहे. त्यापाठोपाठ उस्मनाबादमधील २०५ प्रकल्पांत ३० टक्के, परभणीतील २२ प्रकल्पात ३२ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत ३२ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ३३ टक्के, औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ३५ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३५ टक्के, तर नांदेडमधील ८८ लघू प्रकल्पांत ३९ टक्केच उपयुक्त पाणी आहे.
१३ लघू प्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील ७५२ लघू प्रकल्पांपैकी १३ लघू प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ३, बीड व लातूरमधील प्रत्येकी ४, तर उस्मानाबादमधील २ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. ८१ लघू व २ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यात औरंगाबादमधील ८, जालना ७, बीड २०, लातूर १५, उस्मानाबाद १९, नांदेड ७, परभणी २ तर हिंगोलीतील ३ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखालील मध्यम प्रकल्पांत लातूरमधील २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.