नांदेड : महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत कृषिपंप थकबाकी वसुली अभियान सुरु आहे. या उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकरी घेत आहेत. शुक्रवारी (ता. ५) लोहा उपविभागातील शेतकरी शिवानंद वट्टमवार यांनी दोन लाख ५२ हजार ८२० रुपयांचा वीज बिल भरणा केला. त्यांना दोन लाख ३१ हजार २३० रुपयांची सूट मिळाली.
वट्टमवार यांच्या व कुटुंबीयांच्या नावे चार वीज जोडणी आहेत. या चारही कृषिपंपाची एकूण चार लाख ८४ हजार ५० रुपयांची थकबाकी होती. महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांतर्गत निर्लेखनानंतर विलंब आकार व व्याजाच्या १०० टक्के माफीच्या सवलतीच्या आधारे तब्बल दोन लाख ३१ हजार २३० रुपयांची सवलत त्यांना मिळाली. या संधीचा लाभ घेत त्यांनी दोन लाख ५२ हजार ८२० रुपयांचा वीज बिल भरणा केला.
लोहा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सचिन दवंडे व लेखा अधिकारी कार्तिक जाधव यांनी महाकृषी ऊर्जा अभियानातील धोरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर हे धोरण कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. याची प्रचिती वट्टमवार यांना आली. त्यांनी एकरकमी थकबाकी भरून महावितरणचे सन्माननीय वीजग्राहक असल्याचा बहुमान प्राप्त केला.
महाकृषी धोरण हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या संधीचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या प्रसिद्धीसाठी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण आणि त्यांची चमू परिश्रम घेत आहे आहेत.