पुणे : उन्हाच्या चटक्यामुळे अनेक भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून (ता.१७) ते सोमवारपर्यंत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तर कर्नाटक ते मध्य प्रदेशाचा आग्नेय भाग व महाराष्ट्र या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
ढगाळ वातावरणाच्या स्थितीमुळे उन्हाच्या चटका काहीसा कमी झाला असला, तरी उकाड्यात मात्र वाढ झाली आहे. येते तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी पडतील. कोकणात व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अंशतः हवामान डगाळ राहणार असून, राज्यातील उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. तर अनेक ठिकाणी पारा सरासरीपेक्षा अधिक आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मध्य महाराष्ट्रात ३१ ते ३८ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. विदर्भातील उन्हाच्या चटक्यात वाढ झाल्यामुळे बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३९.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर या भागात कमाल तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
बुधवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) ३५.५
- अलिबाग ३१.६
- रत्नागिरी ३४.४
- डहाणू ३२.७
- पुणे ३६.६
- जळगाव ३८.९
- कोल्हापूर ३६.७
- महाबळेश्वर ३१.१
- मालेगाव ३८.६
- नाशिक ३६
- सांगली ३६.५
- सातारा ३६.१
- सोलापूर ३८.५
- औरंगाबाद ३६.६
- परभणी ३७.२
- नांदेड ३८.५
- बीड ३८.७
- अकोला ३९
- अमरावती ३७.८
- बुलडाणा ३८.७
- ब्रह्मपुरी ३९.१
- चंद्रपूर ३८.४
- गोंदिया ३६.५
- नागपूर ३७.३
- वर्धा ३८.४