कोल्हापूर : नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरणांतर्गत राज्यातील ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषिपंप वीजबिलापोटी ५११ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम भरली आहे.
कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी ‘महावितरण’मार्फत महाकृषी ऊर्जा अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या ५११ कोटी २६ लाख रकमेवर २५६ कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण ५ लाख ८२ हजार ११४ शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे.
राज्यातील ४४ लाख ४४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८५ कोटी रुपयांची थकबाकी असून, या नवीन योजनेमुळे एकूण ३० हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या सर्कलमध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच सर्कलच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची तरतूद या धोरणात असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले
प्रादेशिक कार्यालयनिहाय वसूल थकबाकी (कोटी रुपयांत)
२०१.२०
पुणे
१७२.४८
कोकण
४८.१५
नागपूर
८९.४४
औरंगाबाद