पुणे : ‘‘शेती क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतीचे प्रश्न वाढत चालले आहेत. दहा, वीस वर्षांपूर्वी जे प्रश्न नव्हते, ते प्रश्न आता पुढे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन समूहाने शेती केली पाहिजे’’, असे मत उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेला देशमुख यांनी बुधवारी (ता. २४) भेट दिली. नायब तहसीलदार ज्ञानेश्वर यादव, मंडलअधिकारी एन. एम. खैरे, माधव बिराजदार, ग्रामीण संस्थेचे सचिव गीताराम कदम, संचालक शरद पाबळे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘एकट्याने शेती करण्याचा व्यवसाय राहिलेला नाही. तर, ती गटाने केली पाहिजे. त्यासंदर्भात नाथराव कराड यांनी मराठवाड्यात सामूहिक शेतीसंबंधी खूप चांगली जनजागृती केली होती. ती आता काळाची गरज बनली आहे. शेती ही व्यावसायिक पद्धतीने केली पाहिजे. आपण शिक्षण घेऊनही कुठे कमी पडतो, हे पाहण्याची गरज आहे.’’
‘‘शेतकऱ्यांनी शेती आधारित उभारलेले प्रक्रिया उद्योग, चांगले उपक्रम शेतकऱ्यांना दाखविणे अपेक्षित आहे. कारण शेतीच्या वाढत्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. त्यासाठी असे उपक्रम लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. शेतीतून उत्पन्न वाढविणे हा उद्देश घेऊन ग्रामीण तंत्रज्ञान संस्था काम करत आहे. त्याचा सहभागी झालेल्या चांगल्या व्यक्तीनी प्रचार व प्रसार केला पाहिजे. यातून काही प्रमाणात शेतकरी निश्चितच पुढे येऊ शकतात,’’ असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या यशोगाथा, लेख हे शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. त्यांची जिल्हानिहाय यादी तयार केली होती. त्यातील शेतकरी कधी आणि कुठे भेटतील याची वाट पाहत असतो. जाईल त्या ठिकाणांवरील शेतकऱ्यांची माहिती घेऊन आवर्जून त्यांच्या शेतीची पाहणी करण्याचा उद्देश असतो.
– संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी, पुणे