सातारा ः जिल्ह्यातील प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा कमी होणार आहेत. धोम बलकवडी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्याच्या वीज निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोयना धरणात ६५.३२ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे सर्वच धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. यामुळे मार्च महिना सुरू झाला असला, तरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोयना धरणात ६५.४० टीएमसी म्हणजेच ६५.३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
यावर्षी मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यास या धरणातील पाण्याचा विसर्ग नेहमीपेक्षा अगोदर करावा लागणार आहे. यामुळे पुरस्थितीची भीती आहे. यामुळे शिल्लक पाणीसाठा व पावसाचे प्रमाण यावर कोटेकोरपणे नियोजन करावे लागेल.
उरमोडी धरणातही ८५.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांना फायदेशीर ठरणार आहे. कोयनासह इतर प्रमुख धरणांतही मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये धोम धरणात ६८.०६ टक्के, कण्हेर ४९. ६५, धोम-बलकवडी ३४.४०, उरमोडी ८५.११, तारळी ७४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.