सातारा ः केंद्रातील भाजप सरकारने शेतकरीविरोधी कायदे, कामगारविरोधी कायदे, तसेच पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसवर झिजिया कर लादले आहेत. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (ता.२६) राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसीलदार कार्यालयांसमोर प्रदेश प्रतिनिधी, तालुकाध्यक्षांच्या उपस्थितीत सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत हे आंदोलन होईल.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांकरिता जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी तालुकानिहाय निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
सातारा – ॲड. दत्तात्रेय धनावडे, कऱ्हाड (दक्षिण)- निवास थोरात, कऱ्हाड (उत्तर)- प्रदीप जाधव, जावळी- बाबासाहेब कदम, महाबळेश्वर – रजनी पवार, वाई – चंद्रकांत ढमाळ, खंडाळा – प्रतापराव देशमुख, फलटण – नाजीम इनामदार, माण – मनोहर बर्गे, खटाव – झाकिर पठाण, कोरेगाव-विश्वंभर बाबर, पाटण- दुर्गेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संबंधित तालुक्यांत आंदोलने होतील.
पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कार्यकारिणी सदस्य, तसेच जिल्ह्याचा महिला सेल, सेवादल, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक, युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे, तर तालुक्याच्या ठिकाणी तालुका स्तरावरील सर्व कार्यकारिणी सदस्य, तालुका उपाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.