पांगरी, जि. सोलापूर : मागील वर्षीच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीस कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाउन झाले अन् शेतकऱ्यांनी वर्षभरात अहोरात्र मेहनत घेऊन पिकविलेली द्राक्षे कमी दराने, नुकसान सोसून विकावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली. त्यातून उभारी घेत पुढील वर्षा तरी या नुकसानीची भर निघून जाईल या दृष्टीने या वर्षी ही मोठ्या प्रमाणात खर्चाबरोबर मेहनत करून चांगल्या प्रतीच्या द्राक्षेचे उत्पादन केले. मात्र, या वर्षी ही पुन्हा द्राक्ष हंगामात कोरोनाने डोके वर काढले. त्यात आणखीन भर पडली ती अवकाळी पावसाची आणि ढगाळ वातावरणाची. त्यामुळे द्राक्षे बागायतदार पूर्णपणे कोलमडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाबरोबर शुक्रवारच्या मध्यरात्री रिमझिम पडलेल्या पावसामुळे द्राक्षे बागायतदारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्षे हंगामास सुरुवात झाली आहे. मात्र व्यापारी द्राक्ष बागेपर्यंत येण्यास तयार होईना. तर द्राक्षे कशी विकायची आणि झालेला खर्च कसा भरून काढायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बार्शी तालुक्याचा पूर्व भाग द्राक्ष शेतीत अग्रेसर म्हणून ओळखला जातो. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे द्राक्षे बागेची ऑक्टोबर छाटणी एक महिना उशिराने करावी लागली. त्यामुळे सर्रास बागा विक्रीसाठी एकच वेळी आल्या आहेत. मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्ग वाढला होता. त्यातच लॉकडाउन झाले आणि विक्रीस आलेला चांगल्या प्रतीचा माल असताना देखील कवडीमोल किमतीचे विकावा लागला.
बाजारपेठेत द्राक्षांना उठाव नसल्यामुळे व्यापारी घेतलेल्या बाग सोडून जात आहेत. मागील वर्षांचीच पुनरावृत्ती होत असल्याने दिसून येत आहे. ५० ते ६० रुपये किलो दराने जाणारे द्राक्षे २० ते २५ रुपये दराने मागे लागून देण्याची वेळ आली आहे. खते, औषधांच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. मजुरी आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. या सर्वांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
प्रतिक्रिया
सलग दोन वर्षे द्राक्षांना समाधानकारक भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षात अतिवृष्टीमुळे फळबागेचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामेही झाले. मात्र अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.
-विष्णू पवार, पांगरी, ता. बार्शी
लॉकडाउनच्या चर्चेमुळे द्राक्षाचे भाव व्यापाऱ्यांनी पाडले आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीस ५० ते ६० रुपये दराने चालू झालेले द्राक्षाचे भाव नुसत्या लॉकडाउनच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांनी २० ते २५ रुपयांवर आणले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाची धास्ती आहेच. एकरी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होत आहे. एकरी दहा टन द्राक्ष उत्पादन निघाले तरीही तोटाच होत आहे.
-अन्सार पठाण, जहानपूर, बार्शी